उद्रेक न्युज वृत्त
ब्रह्मपुरी :- राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन सत्तांतर झाले होते.त्यात नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे पद होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यामुळे हल्ली राज्यात दोन उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत.त्याच धर्तीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दोन उपसरपंच पद निर्माण करण्यात यावे; याबाबतचे निवेदन ब्रह्मपुरी येथील सरपंच संघटनेने भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे
भारतीय संविधानानुसार लोकशाही व्यवस्थेत लोकसभा,राज्यसभा तर राज्यात विधानसभा व विधानपरिषद या सभागृहातून राज्याचा चालवला जातो.ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावखेड्याचा विकासात्मक कारभार केला जातो. त्याकरिता ग्रामपंचायतमध्ये दर पाच वर्षांत निवडणुका घेऊन सरपंच,उपसरपंच यांची निवड करून विकासात्मक कारभार चालवला जातो. राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्याचा कारभार चालविण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांच्या नियंत्रणात मंत्रिमंडळ व उपमुख्यमंत्री पद निर्माण करण्यात आले होते.त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कारभार चालवीत होते.मात्र नुकतेच शिंदे फडणवीस सरकार असतांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने अजित पवार ते सरकारमध्ये सामील झाले.याच धर्तीवर ग्रामपंचायती मध्ये सुध्दा दोन उपसरपंच पद निर्माण करावे; अशी मागणी सरपंच संघटनेंनी केली आहे.