Monday, August 31, 2026
Homeनागपूरतीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांनी चढवला हल्ला…-मानेची मुख्य नस कापल्याने बालकाचा मृत्यू…

तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांनी चढवला हल्ला…-मानेची मुख्य नस कापल्याने बालकाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यामधील गणेश नगर परिसरातील तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला.या हल्ल्यामध्ये बालक गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.वंश असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.वंशचे वडील कामावर गेले होते.तर आई घरकामात व्यस्त असताना वंश खेळता- खेळता घराच्या बाहेरील गेटजवळ गेला.त्या ठिकाणी २ ते ३ मोकाट कुत्रे होते.अचानक त्या कुत्र्यांनी वंशवर हल्ला केला.हल्ल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांना वंशच्या रडण्याचा,ओरडण्याचा आवाज आल्याने त्या लोकांनी धाव घेत वंशला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.

यानंतर शरीराचे लचके तोडल्याने वंश गंभीररित्या जखमी अवस्थेत पडला होत.यानंतर जखमी मुलाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान वंशचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय आधिकऱ्यांनी दिली.या घटनेनंतर परिसरात लोकांमध्ये मोकाट कुत्र्यांबद्दल दहशत निर्माण झाली आहे.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,या हल्ल्यात कुत्र्यांनी वंशची मान तोंडात धरली होती.दरम्यान मानेची मुख्य नस कापल्याने त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!