राज्यात सोमवार ३० जून पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले.या अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल,मंगळवारी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले होते.त्यामुळे काँग्रेसचे नाना पटोले यांचे एका दिवसासाठी निलंबनदेखील करण्यात आले होते.त्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले. राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात.जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू होतो,तेव्हा त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते.अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते आहे.पण ही मदत वाढवून १० लाखांची करावी,अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.महाराष्ट्रात वीज पडून वर्ष २०२२ मध्ये २३६ मृत्यू झाले आहेत तर वर्ष २०२३ मध्ये १८१ इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.त्यामुळे वीज पडून मृत्यू झालेले शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबाला १० लाख इतकी मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केल्यानंतर यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता.पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे,असे सांगितले.तसेच या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार करू आणि याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे मंत्री महाजन यांनी म्हटले.
तिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक; वीज कोसळून मृत्यू झाल्यास १० लाखाची मदत देण्याची मागणी.. -अधिवेशनातील तारांकित प्रश्नात विजय वडेट्टीवारांनी मुद्दा केला उपस्थित..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी १० लाख रुपयांची मदत द्यावी,अशी मागणी केली आहे.वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख रुपयांची मदत केली जाते.तर वीज कोसळून मृत्यू झाल्यास भरपाई म्हणून केवळ चार लाख रुपयांची मदत केली जाते.ही मदत पुरेशी नसल्याने या मदतीची रक्कम वाढवावी,असे विजय वडेट्टीवार यांनी आज,बुधवार २ जुलै रोजी सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात म्हटले आहे.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

