Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना शॉक; एसटीच्या तिकिट दरात वाढ करण्याचा निर्णय..

तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना शॉक; एसटीच्या तिकिट दरात वाढ करण्याचा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घालून सर्वसामान्य नागरिकांची घरे,जनावरे,जीवनावश्यक वस्तू तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ओढवले आहे.आधीच पावसामुळे होत्याचे नव्हते झाल्याने दिवाळीसारखा मोठा सण कसा साजरा करायचा?या विवंचनेत असतांनाच सरकारने तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना शॉक देत एसटीची दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने दरवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
रोजची रोजी-रोटी कमवून खाणारे,कामासाठी बाहेर पडलेले कामगार,विद्यार्थी व इतर सर्वसामान्य नागरिक दिवाळीसारख्या मोठ्या सणात घरी परत येत असतात. नेमकी हीच संधी साधून सरकारने पुढील महिन्याच्या १५ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या काळात एसटीच्या तिकिट दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,जानेवारी २०२५ मध्ये एसटी महामंडळाने १४.९५ टक्के दरवाढ लागू केली होती.हे दर एसटीच्या सर्व सेवांसाठी लागू करण्यात आले होते.तर आता शिवनेरी व शिवाई या दोन बसेस सोडता इतर एसटी बसेससाठी दिवाळीत १० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी भर पडून मोठा आर्थिक फायदा होणार आहे.पण, “या हाताने देणे आणि दुसऱ्या हाताने नेणे”,असे चालू धोरण सरकार राबवित असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.त्यामुळे न दिलेलं बरं,अशी वाणी अनेकांच्या मुखातून उमटू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!