Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीअस्मानी संकट हे शेतकऱ्यांच्याच नशिबी कां?.. - शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी...

अस्मानी संकट हे शेतकऱ्यांच्याच नशिबी कां?.. – शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी आमदार मसराम यांचे महसूल प्रशासनास निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कष्टाने पेरलेली पिके पावसाच्या तडाख्यामुळे जमिनीवर कोलमडून पडली आहेत.आधीच उत्पन्न कमी तर उत्पादन खर्च जास्त असतांनाच नैसर्गिक संकटाने भर घालून शेतकऱ्यांची भाकरी मुखातून हिरावून घेतली असल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळावी,यासाठी स्थानिक महसूल प्रशासनासह जिल्हा प्रशासनास निर्देश दिले आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी छातीला माती लावून शेती कसतो आहे.पैश्याची जुळवाजुळव करून धानपीकांसाठी राबतो आहे; अश्यातच अस्मानी संकट हे शेतकऱ्यांच्याच नशिबी कां? सततची नापिकी,किडीचा प्रादुर्भाव,लहरी पाऊस कधी पडतो तर कधी एकही थेंब पडत नाही.त्यातच बरसला तर सर्वकाही उद्ध्वस्त करून सोडत असतो.त्यामुळे शासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,असेही आमदार मसराम म्हणाले.महसूल प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार लवकरच सर्व बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
  • आमदार रामदास मसराम👇
शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे.प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत भरपाईची मदत पोहोचली पाहिजे.यासाठी झालेल्या पंचनाम्यांची यादी पारदर्शक पद्धतीने प्रकाशित करावी,जेणेकरून कोणताही शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!