उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- तालुक्यात तळीरामांचा गावठी दारू पिण्याकडे कल वाढून ग्रामीण भागात गावठी मोहफुलांची दारू पिण्यासाठी दारू विक्रेत्यांच्या घरासमोर दररोज रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.गावठी दारू विक्रेत्यांकडे कुरखेडा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने भेसळयुक्त दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
कुरखेडा तालुक्यात दारू पिणारे गावठी मोहफुलांच्या दारूच्या शोधात गावोगावी भटकंती करतांना दिसून येत आहेत.गावठी दारूचा महापूर सध्या स्थितीत ग्रामीण भागात जोर धरू लागला आहे.गावठी दारू स्वस्त दरात मस्त असल्याने तळीरामांचा कल वाढला आहे.काही गावठी दारू विक्रेते भेसळयुक्त दारू विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येते.गावठी दारूमध्ये युरिया खत,नवसागर,गुंगी येणारी औषधे,झाड पत्ति व इतर साहित्य पदार्थांची मिलावटी करून दारूची विक्री करीत आहेत.गावठी दारू विक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी खेळून मिलावटी करून दारू विक्री करीत असल्याने दारू विक्रेते मालामाल व पिणारे कंगाल अशी अवस्था झाली आहे.यासाठी अवैध गावठी दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे जनसामान्यांतुन बोलल्या जात आहे.