Sunday, August 30, 2026
Homeनागपूरतलाव परिसरात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू..

तलाव परिसरात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-तलाव परिसरात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पोहण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्याच्या सालईमेंढा तलाव परिसरात घडली.आदित्य रामचंद्र चहांदे वय १९ वर्षे,रा.राजीवनगर,एमआयडीसी, नागपूर व अभिषेक अमीरचंद सिरसाम वय १९ वर्षे, रा.सिंदेवाही,जि.चंद्रपूर,हल्ली मुक्काम रॅमसन कंपनी,निलडोह,हिंगणा अशी मृतक तरुणांची नावे आहेत.
हिंगणा तालुक्यातील रॅमसन कंपनीमध्ये काम करणारे आदित्य,अभिषेक,आकाश मतचिरके,नयन सहारे व यश भारद्वाज हे पाचही मित्र काल बुधवारची सुट्टी असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींवरून सालईमेंढा तलाव परिसरात गेले होते. दरम्यान,आदित्य व अभिषेक हे दोघेही तलावातील पाण्यात पोहण्यासाठी तलावात उतरले.मात्र,त्यांना खोल पाण्याचा अंदाज न दोघेही तलावातील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.अश्यातच तलावाच्या काठावर असलेले तीन मित्र घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली.त्यातच,तिन्ही मित्रांना पोहता येत नसल्याने दोघेही खोल पाण्यात बुडू लागले.याचवेळी आकाश मतचिरके याने तात्काळ ११२ क्रमांकावर फोन करून मदत मागितली.त्यानंतर,हिंगणा पोलिस आणि नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधकार्यास सुरुवात केली. बराच वेळ शोधकार्य राबविल्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह रात्री साडेसात वाजेच्या सुमारास तलावातून बाहेर काढण्यात आले.प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणांच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!