Wednesday, July 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततर जिथे उभे राहाल,तिथेच वाहन होणार जप्त..!

तर जिथे उभे राहाल,तिथेच वाहन होणार जप्त..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा काय होणार? असे मानून कमी वयाची मुले-मुली शहरी भागासह ग्रामीण भागात सुसाट वेगाने वाहने चालवीत वाहन कायद्याचे उल्लंघन करतांना दिसून येतात.अशातच आता
कोणतेही वाहन १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक चालवितांना आढळल्यास तेथेच वाहन जप्त करून पोलिसांनी ताब्यात घ्यावे; असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आले आहेत.
याशिवाय मालवाहतुकीसाठी २० वर्षे ही वयोमर्यादा असून ती कठोरपणे पाळण्यात यावी; असेही आदेश देण्यात आले आहेत.ई-चलनाबाबतही आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे.वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ.सुरेशकुमार मेकला यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.ई-चलन जारी करणे आणि दंडात्मक वसुलीसह वाहन जप्तीबाबत ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे.१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास पोलिसांकडून वाहन ताब्यात घेतले जाते.संबंधित चालकाच्या पालकांना वा संबंधित व्यक्तीला पाचारण केले जाते.चालक तसेच पालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.आता नव्या परिपत्रकानुसार पोलिसांना वाहन जप्तीचीही कारवाई करावी लागणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मार्कंडादेव येथे जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी थेट संवाद.. – भूसंपादन,मंदिर संवर्धन,पूरनियोजन,आरोग्य सुविधा व रोजगार विकासाला गती देण्याचे यंत्रणांना निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मार्कंडादेव परिसरातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे संबंधित...

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू(पुरुष...

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने धडकेत बिबट्या गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत पावल्याची घटना सावनेर तालुक्याच्या पांढुर्णा-सावनेर महामार्गावरील...

वाघ आढळला मृतावस्थेत; परिसरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील चितेगाव बिट आणि राजोली राऊंड अंतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील चिखली चक क्र.२ येथील बिगर वनक्षेत्रात सर्व्हे क्रमांक ७८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!