Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततब्बल २२ नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण..

तब्बल २२ नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोठे पाऊल उचलत देशातून ३१ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा मोठा संकल्प केला आहे आणि त्या दिशेने कारवाया सुरू असतांनाच पोलिसांना मोठे यश मिळू लागले आहे.नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाया,नवीन सुरक्षा छावण्यांची स्थापना आणि विकास प्रकल्पांचा वाढता विस्तार यामुळे नक्षलवाद्यांचा प्रभाव सातत्याने कमी होत आहे.अश्यातच छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात तब्बल २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले की,एका महिलेसह या कार्यकर्त्यांनी सरकारच्या ‘पूना मार्गेम’ (न्यू डॉन) पुनर्वसन योजनेअंतर्गत वरिष्ठ पोलिस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर काल मंगळवारी आत्मसमर्पण केले आहे.आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली आणि सरकारच्या धोरणानुसार त्यांचे पुढील पुनर्वसन केले जाईल. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यात जिल्हा राखीव रक्षक(DRG)सुकमा,जिल्हा बल सुकमा,रेंज फील्ड टीम(RFT)जगदलपूर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने महत्त्वाची भूमिका बजावली,असेही पोलिस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!