- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आपल्या आत्याकडे राहून लहानाची मोठी झालेल्या एका अनाथ अल्पवयीन मुलीवर भूतबाधा काढून देण्याच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबा व त्याच्या साथीदाराला नागपूर विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.पी.पांडे यांनी काल मंगळवारी दहा वर्षे सश्रम कारावासाच्या कमाल शिकक्षेसह प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले.मनोहर मारोती कोल्हे वय ५८ वर्षे, रा.हेटी,सावनेर,जि.नागपूर असे ढोंगी बाबाचे नाव आहे तर,युवराज धनराज सोनटक्के वय ४३ वर्षे, पहलेपार, सावनेर असे साथीदाराचे नाव आहे.
सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या घटनेतील पीडित मुलगी घटनेच्यावेळी सारिका(काल्पनिक नाव) १७ वर्षे वयाची होती.तिच्यावर मनोरुग्णालयात उपचार सुरू होते; प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पालक वर्ग चिंतेत होते.दरम्यान,३ मे २०२२ रोजी सोनटक्के सारिकाच्या पालकांना भेटला व सारिकाला भूतबाधा झाली असेल,असा संशय व्यक्त करून तिला ढोंगी बाबा कोल्हेकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.कोल्हेकडे बरेच लोक १०० टक्के दुरुस्त झाले आहेत,असेही त्याने सांगितले.त्यामुळे पालकांनी सारिकाला कोल्हेकडे नेले.सोनटक्केही त्यांच्यासोबत होता.त्यावेळी कोल्हेने सारिकाला जीन लागल्याचे सांगून एक लिंबू कापले व त्यावर कापूर जाळून उतारा काढला.सारिकाच्या कंबरेला बांधण्यासाठी काळा दोरा दिला.तसेच,सारिकाला एका रात्रीसाठी स्वत:जवळ ठेवून घेतले.त्यानंतर कोल्हे व सोनटक्केने सारिकावर बलात्कार केला.प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हे दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.विशेष सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गतही दोषी ठरवले आणि काल मंगळवारी दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली.सारिका लहानपणापासूनच अनाथ आहे.तिची आई २००६ तर,वडील २००८ मध्ये मरण पावले.ती एक वर्षाची होती तेव्हापासून आत्याकडे राहत आहे.आत्याच तिचे पालनपोषण व देखभाल करीत आहे.
- Advertisement -

