Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीझाडीपट्टी नाटकाचा संत्रानगरीत सन्मान... चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'जत्रा घडली नागोबाची' महानाट्यास...

झाडीपट्टी नाटकाचा संत्रानगरीत सन्मान… चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ महानाट्यास साहित्य विहार नागपूरचा पुरस्कार जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-साहित्य विहार,नागपूर या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना साहित्य विहारच्या वार्षिक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराकरीता मराठी साहित्य प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित ‘जत्रा घडली नागोबाची’ या नाटकास यंदाचे नाट्यलेखनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे साहित्य विहारच्या अध्यक्षा व सर्वेसर्वा,बहुभाषिक प्रसिद्ध साहित्यिक आशा पांडे व सचिव मंदाताई खंडारे यांनी निवड पत्राद्वारे कळविले असून श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह,महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,वोक्हार्ट हॉस्पीटल परिसर,शंकरनगर चौक जवळ,नागपूर येथे येत्या,रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजे  होणाऱ्या साहित्य संमेलनात सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह,सन्मान वस्त्र व सन्मानपत्र असे आहे.विशेष म्हणजे,चुडाराम बल्हारपुरे यांना यंदा मिळालेला हा तिसरा सन्मान आहे.नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कांगोणी येथील श्री संत किसन महाराज मुंडके जीवन गौरव पुरस्कारासह त्यांच्या ‘महापूजा’ या नाटकास नाट्यलेखनाचा प्रथम पुरस्कार मिळाला.तर साहित्य अर्चन मंच,नागपूर येथील मराठी व हिंदी साहित्य स्पर्धेत त्यांच्या ‘गोडवानाचा महायोध्दा क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या महानाट्यास नाट्यलेखनाचे पुरस्कार जाहीर झाले असून येत्या ८ नोव्हेंबरला हिंदी साहित्य संमेलन, मोरभवन,नागपूर येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.तर साहित्य विहार संस्था,नागपूरच्या वतीने घोषित करण्यात आलेला ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास द्वितीय क्रमांकाचा हा पुरस्कार देखील संत्रानगरी नागपूर येथे प्रदान केला जाणार आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन १९९३ चा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आजपर्यंत त्यांची विविध १५ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.महामृत्युंजय मार्कंडेश्वर,महापूजा,बहूढंगी समाधीवाले बाबा,स्पेशल रिपोर्ट,धरती आबा:क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर, डॉ.दिपक चौधरी,रमेश निखारे,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक)यांचेसह इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!