Monday, August 31, 2026
Homeनागपूरडोक्यावरून व पाठीवरून हात फिरविणे विनयभंग म्हणता येणार नाही- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...

डोक्यावरून व पाठीवरून हात फिरविणे विनयभंग म्हणता येणार नाही- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय; आरोपीची निर्दोष सुटका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- लैंगिक हेतू नसल्यास अल्पवयीन मुलीच्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरविल्यामुळे विनयभंग होत नाही; असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.तसेच,आरोपीची निर्दोष सुटका केली. प्रकरणावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

मयूर बाबाराव येलोरे वय २९ वर्षे असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील रहिवासी आहे.प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड तर, घरात बळजबरीने प्रवेश करण्यासाठी चार महिने कारावास व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवली होती.त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून शिक्षा रद्द केली.घटनेच्या वेळी आरोपी १८ वर्षे वयाचा होता तर,पीडित मुलगी १३ वर्षे वयाची होती.पीडित मुलीला आरोपी लहानपणापासून ओळखत होता.आरोपी १५ मार्च २०१२ रोजी मुलीच्या घरी गेला होता.दरम्यान,त्याने मुलीच्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरवून ती खूप मोठी झाली,असे म्हटले.त्यामागे त्याचा वाईट हेतू होता,असा आरोप मुलीने तक्रारीत केला नाही.तिने केवळ आरोपीच्या या कृतीमुळे वाईट व अस्वस्थ वाटले,असा जबाब दिला.तसेच,आरोपीने पाठ व डोक्यावरून हात फिरविण्याशिवाय अधिक काही केल्याचे पोलिसांचे म्हणणे नाही,असे न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.आरोपीतर्फे ॲड.अमोल हंगे यांनी कामकाज पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!