Monday, August 31, 2026
Homeपुणेमहाराष्ट्रात पहिला वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण इन्फ्लुएन्झाचा बळी- कोरोणा नंतर इन्फ्लुएन्झा (विषाणूज्वर...

महाराष्ट्रात पहिला वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण इन्फ्लुएन्झाचा बळी- कोरोणा नंतर इन्फ्लुएन्झा (विषाणूज्वर ) घातक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे (नगर) :- देशभरातील आरोग्य यंत्रणेला खडबडून जागे करणाऱ्या एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाचा (विषाणूज्वर ) महाराष्ट्रातील पहिला मृत्यू नगरमध्ये नोंदवला गेला.एमबीबीएसचे शिक्षण घेणारा २३ वर्षीय तरुण देशातील चौथा बळी ठरला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण गेल्या आठवड्यात ट्रीपसाठी कोकणात गेला होता.तेथून येताच तो आजारी पडला.त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.खासगी रुग्णालया उपचार सुरू असतानाच एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाची टेस्टदेखील पॉझिटिव्ह आली.रेमडेसिवीरसोबत आवश्यक ते डोस सुरू असतानाच सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.या तरुणाच्या संपर्कात आलेल्या १९ विद्यर्थ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून वैद्यकिय महाविद्यालयात मास्क सक्ती करण्यात आली आहे.हरियाणा आणि कर्नाटकात दोन बळी गेल्यानंतर महाराष्ट्रातही एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाचा बळी गेला आणि मंगळवारी गुजरातमध्येही याच तापाने महिलेचा बळी घेतला.

लहान मुलांमध्ये सध्या एच३एन२ विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या आकडेवारीनुसार,१ जानेवारी ते १० मार्च २०२३ दरम्यान तपासलेल्या २५२९ नमुन्यांपैकी १६.९ टक्के म्हणजे ४२८ रुग्ण इन्फ्लूएंझा-ए पॉझिटिव्ह आढळले.६ रुग्ण एच१एन१ पॉझिटिव्ह तर ३९ रुग्ण इन्फ्लूएंझा बी आणि ३५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!