Sunday, May 17, 2026
Homeनागपूरडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची बातमी शहरभर रिक्षावर फिरून रडत-रडत सांगणारे मोरे यांचे निधन..

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची बातमी शहरभर रिक्षावर फिरून रडत-रडत सांगणारे मोरे यांचे निधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले.आंबेडकर यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता.अनेकांना बाबासाहेब आपल्याला सोडून गेलेत,असा विश्वासच बसेनासा झाला होता.अशातच  आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची हृदय हेलावणारी बातमी रिक्षावर शहरभर फिरून रडत-रडत सांगणारे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते दामू मोरे उर्फ दामूदा शिवाजी मोरे यांचे काल सोमवारी ९२ व्या वर्षी निधन झाले.त्यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मेडिकलला देहदान करण्यात आले.दामू मोरे यांचा जन्म एका आंबेडकरी कुटुंबात झाला.साउंड सर्व्हिसचा (डेकोरेशन) त्यांच्या घरगुती व्यवसाय होता.मोरे साऊंड सर्व्हिस तेव्हा चांगलेच प्रसिद्ध होते.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा दामू हे केवळ १२ वर्षांचे होते.त्या दिवशी दुकानात असतांना बातमी मिळाली ‘बाबासाहेब गेले’. घरातील मोठ्यांनी स्वतःचा शोक बाजूला ठेवून,ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लहानग्या दामूवर सोपविली होती.त्या दिवशी नागपूरच्या गल्लीबोळांमध्ये एका रिक्षातून फिरणारा हा छोटा मुलगा,हातात माईक घेऊन,संपूर्ण देशाच्या भावनांवर घाला घालणारी बातमी सांगत होता.लोकांच्या डोळ्यांत पाणी आले,काहींनी विश्वास न बसून त्याच्यावर ओरड केली,काहींनी बातमी खोटी निघाल्यास जिवंत गाडण्याची धमकीही दिली.काहींनी रागाने धाव घेतली; पण त्या आवाजामागे फक्त एक पोरगं नव्हतं,तर एक जबाबदारी होती,एक सत्य होतं आणि एक असीम वेदना होती.दामू मोरे ही आठवण नेहमी सांगायचे.त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी काल सोमवारी मेडिकलमध्ये त्यांचे देहदान केले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक,मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!