Monday, September 28, 2026
Homeनागपूरडीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.राबविलेल्या दोन दिवसीय मोहिमेत वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असलेल्या चार ‘शेकरू’सह अनेक दुर्मीळ प्राण्यांची तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली असून,एका मुख्य तस्कराला अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या नागपूर पथकाला आंध्र प्रदेशातील जंगलातून वन्यजीवांची मोठी तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी श्रीकाकुलम शहरात सापळा रचून एका मुख्य संशयित तस्कराला ताब्यात घेतले.झडतीदरम्यान पिंजऱ्यात डांबून ठेवलेले चार ‘मलबार जायंट स्क्विरल’ (शेकरू),एक स्टार कासव आणि चौदा रानकोंबड्या आढळून आल्या.या तस्कराच्या चौकशीतून या नेटवर्कचे मुख्य केंद्र श्रीकाकुलमपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रायाकुर्डी’ या अतिदुर्गम गावात असल्याचे उघड झाले.२४ आणि २५ जून २०२६ रोजी रात्रीच्या अंधारातच डीआरआयचे पथक डोंगराळ गावाकडे रवाना झाले.गावात वीज आणि मोबाईल नेटवर्क नसतांनाही, अधिकाऱ्यांनी मध्यरात्रीपर्यंत शोधमोहीम राबवली.या मोहिमेदरम्यान,तस्करांच्या छुप्या अड्ड्यावरून ‘स्मॉल इंडियन सिव्हेट'(जवाबी मांजर) या अत्यंत दुर्मीळ प्रजातीची दोन लहान पिल्ले यशस्वीरित्या जप्त करण्यात आली.ही मोहीम अत्यंत धाडसी आणि आव्हानात्मक परिस्थितीत पार पडली.जप्त करण्यात आलेले शेकरू, जवाबी मांजर आणि स्टार कासव हे वन्यजीव ‘वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२’ च्या अनुसूची-१ अंतर्गत येतात.या प्राण्यांना वाघ-सिंहाप्रमाणेच कायद्यानुसार सर्वोच्च दर्जाचे संरक्षण असून,त्यांच्या शिकारीवर, बाळगण्यावर आणि व्यापारावर देशात पूर्णपणे बंदी आहे.सदरचे प्राणी परदेशी पाळीव प्राण्यांच्या बाजारात मोठ्या किंमतीत विकण्याचा तस्करांचा डाव होता; पण तो निष्फळ ठरला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विहिरीतून पाणी काढणार तितक्यात अचानकपणे पाय घसरल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.दिवसभर शेतातील कामे आटोपून विहिरीतून पाणी काढणार तितक्यात  अचानकपणे पाय घसरून तोल गेला...

अखेर बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; बँकांचे कामकाज राहणार नियमित सुरू..

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील बँक कर्मचारी आज, सोमवार २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार होते.मात्र,संपाच्या पूर्वसंध्येला काल रविवारच्या रात्री इंडियन बँक्स...

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!