Saturday, October 17, 2026
Homeमुंबईट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे 'आयपीएस' अधिकारी.. - पहा कोणाला...

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी देण्यात आली आहे.अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला असून येत्या ३१ ऑगस्ट २०२६ पासून हे परिविक्षाधीन अधिकारी महाराष्ट्र संवर्गात रुजू होणार आहेत.या सर्वांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि व्यावहारिक ज्ञान यासाठी परिविक्षाधीन कालावधी महत्वाचा घटक असतो.या आयपीएस अधिकाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजेच ‘एसडीपीओ’ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.यात १२ पैकी ५ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.महत्वाचे म्हणजे,१२ अधिकाऱ्यांपैकी ६ अधिकारी २०२३ च्या तुकडीतील,तर सहा अधिकारी २०२४ च्या तुकडीतील आहेत.प्रशिक्षणानंतर आता त्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरून कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाचा कारभार हाताळावा लागणार आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२६ पासून हे अधिकारी आपल्या नव्या ठिकाणी पदभार स्वीकारणार आहेत.
  • अधिकाऱ्यांचे नाव व त्यांची पदस्थापना👇
१.अरांक्षा यादव-तुकडी वर्ष- २०२३- उप विभागीय पोलीस अधिकारी,रत्नागिरी उपविभाग,रत्नागिरी.
२.कायांदेपाटील गुरव गंगाधर-तुकडी वर्ष-२०२३-
उप विभागीय पोलीस अधिकारी,उमरखेड उपविभाग, यवतमाळ.
३.कुमार सुशांत-तुकडी वर्ष-२०२३- उप विभागीय पोलीस अधिकारी,राजूरा उपविभाग,चंद्रपूर.
४.मेघना आय.एन.-तुकडी वर्ष-२०२३-
उप विभागीय पोलीस अधिकारी,लातूर(ग्रामीण).
५.राहुल कुमार-तुकडी वर्ष-२०२३- उप विभागीय पोलीस अधिकारी,परभणी शहर उपविभाग,परभणी.
६.राहुल रमेश आत्राम-तुकडी वर्ष-२०२३- उप विभागीय पोलीस अधिकारी,आर्वी उपविभाग,वर्धा.
७.सागर संजय भामरे -तुकडी वर्ष-२०२४- उप विभागीय पोलीस अधिकारी,भामरागड उपविभाग, गडचिरोली.
८.ईशानी आनंद-तुकडी वर्ष-२०२४- उप विभागीय पोलीस अधिकारी,अचलपूर उपविभाग,अमरावती (ग्रामीण).
९.जान्हवी बाळासाहेब शेखर-तुकडी वर्ष-२०२४-
उप विभागीय पोलीस अधिकारी, गंगापूर उपविभाग, छत्रपती संभाजी नगर(ग्रामीण)
१०.सारदा तेजस सुदिप-तुकडी वर्ष-२०२४-
उप विभागीय पोलीस अधिकारी,भंडारा उपविभाग, भंडारा.
११.शशांत एन.एम.-तुकडी वर्ष-२०२४-
उप विभागीय पोलीस अधिकारी,कामठी उपविभाग, नागपूर (ग्रामीण).
१२.सुयश कुमार सिंग-तुकडी वर्ष-२०२४-
उप विभागीय पोलीस अधिकारी,धानोरा उपविभाग, गडचिरोली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!