Saturday, April 18, 2026
Homeब्रम्हपुरीट्रॅक्टरची स्कूटीला जोरदार धडक; दोन विद्यार्थी जखमी.. - एकजण ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात..

ट्रॅक्टरची स्कूटीला जोरदार धडक; दोन विद्यार्थी जखमी.. – एकजण ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-शाळेत जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या स्कूटीला वाटेतच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.यात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यावस्थेत आहे.तर एका विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर मार लागला.यश प्रकाश मेश्राम वय १४ वर्षे,रा.अऱ्हेरनवरगाव,ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर असे गंभीर जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे,तर त्याचा सहकारी मित्र रोनक राजू नागापुरे वय १४ वर्षे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.दोघेही ब्रम्हपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी शाळेतील विद्यार्थी आहेत.
यश व रोनक हे आज सकाळच्या सुमारास अऱ्हेरनवरगाव येथून एमएच ३४ सीपी ६१३९ क्रमांकाच्या एक्टिवा मोपेड स्कूटीने नेवजाबाई हितकारिणी शाळेत ध्वजारोहण समारंभ कार्यक्रमासाठी निघाले होते.अश्यातच बोंडेगाव ते कुर्झा रोडवरील राधाकृष्णनगरी जवळ येताच भरधाव वेगात येणाऱ्या एमएच ३४ सीडी ७६६८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी जोरात खाली कोसळले.यात एकाच्या डोक्याला तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली.प्रकरणी सोनू भुते यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रॅक्टरचालक दुर्योधन तलमले याचे विरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५(ए),१२५(बी)सह १८४, १३४ एमव्ही ॲक्ट  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तेजराम जनबंधू करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!