Monday, May 4, 2026
Homeगडचिरोलीटेम्पोची दुचाकीला धडक; आई-वडिलांच्या डोळ्या देखत चिमुकलीचा मृत्यू.. - गडचिरोली जिल्ह्यातील घटना..

टेम्पोची दुचाकीला धडक; आई-वडिलांच्या डोळ्या देखत चिमुकलीचा मृत्यू.. – गडचिरोली जिल्ह्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पती-पत्नी व साडेतीन वर्षाच्या  चिमुकलीसह तिघेही दुचाकीने एटापल्लीहून
अहेरीकडे आरोग्य तपासणीसाठी जात असतांना वाटेतच येलचील गावाजवळ एका छोट्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेत दुचाकीस्वार
तिघेही खाली कोसळले.मात्र,झालेल्या अपघातात आई-वडिलांच्या डोळ्या देखत साडेतीन वर्षीय
चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २४ जून रोजी दुपारच्या सुमारास अहेरी तालुक्यातील येलचील पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडली.आरोही विशाल काळे,रा.ता.एटापल्ली,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
माहितीनुसार,चिमुकलीचे वडील विशाल काळे हे लॉयड मेटल एनर्जी लिमिटेड(सुरजागड लोहखान)
कंपनीत वाहनचालक असून ते आज मंगळवारी पत्नी आणि साडेतीन वर्षांच्या चिमुकली आरोहीसह एटापल्लीहून अहेरीकडे आरोग्य तपासणीसाठी दुचाकीने निघाले होते.अश्यातच वाटेत येलचील गावाजवळ अचानकपणे एका छोट्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,तिघेही खाली कोसळले.मात्र,यात आरोही गंभीररीत्या जखमी झाली.घटना घडताच बघ्यांनी गर्दी करीत तात्काळ पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन व चालकास ताब्यात घेतले व कुटुंबाला अहेरी उपजिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी आरोहीला मृत घोषित केले.चिमुकलीच्या जाण्याने आई-वडिलांवर मानसिक तीव्र धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!