Saturday, August 8, 2026
Homeनागपूरबँक अध्यक्षपदाच्या अपात्रता प्रकरणी बच्चू कडूंना दिलासा.. - मुंबई उच्च न्यायालयाच्या...

बँक अध्यक्षपदाच्या अपात्रता प्रकरणी बच्चू कडूंना दिलासा.. – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.त्यानुसार  आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याने शनिवार १४ जून रोजी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करीत करण्यात आले होते.आंदोलन स्थगित करताच बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून १६ जून रोजी अपात्र ठरविण्यात आले होते.बच्चू कडू यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये नाशिक येथील एका आंदोलनप्रकरणात सुकरवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शासकीय कामात अडथळा आणि मारहाण केल्यावरून न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार,बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावल्यास त्याला पदावर राहता येत नाही.हीच बाब पुढे करीत बँकेच्या विरोधी गटातील बारा संचालकांनी हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांना नोटीस बजावली होती.यानंतर बच्चू कडू यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते.याआधारे सहनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला होता.शिवाय त्यांना पाच वर्षांपर्यंत बँकेची कोणतीही निवडणूक लढता येणार नव्हती.याविरुद्ध बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. यावर आज,मंगळवार २४ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीत न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.यामुळे बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायालयाने अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून दिलेला निर्णय हा सत्याचा विजय आहे,अशा शब्दांत बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!