Monday, July 27, 2026
Homeमुंबईटी-२० वर्ल्डकप २०२४ ची प्रतीक्षा अखेर संपली…-स्पर्धेची सुरूवात होणार उद्यापासून…

टी-२० वर्ल्डकप २०२४ ची प्रतीक्षा अखेर संपली…-स्पर्धेची सुरूवात होणार उद्यापासून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- टी-२० वर्ल्डकप २०२४ची प्रतीक्षा अखेर संपली आहे.अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेची सुरूवात १ जून म्हणजेच उद्यापासून होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला जाणार आहे.हा सामना डलासमध्ये हा सामना रंगणार आहे.अमेरिकेच्या वेळेतील बदलामुळे भारतात टी-२० वर्ल्डकपची सुरूवात २ जूनपासून होणार आहे.

स्पर्धेच्या नॉकआऊटसह एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत.२९ दिवस हे सामने रंगणार आहेत. टीम इंडिया आपल्या अभियानाची सुरूवात ५ जूनपासून करत आहेत.ग्रुप ए मध्ये टीम इंडियाचा समावेश आहे. टीम इंडिया चार लीगचे सर्व सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. तर काही संघ ग्रुप लीगचे सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. अशातच क्रिकेट चाहत्यांच्या मनात स्पर्धेच्या टायमिंगबाबत सवाल आहेत.

भारतीय चाहत्यांच्या मनात टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळेबाबत संभ्रम आहे. भारतीय संघाचे सर्व लीग सामने अमेरिकेत होत आहेत. सुरूवातीचे तीन सामने न्यूयॉर्क तर शेवटचा लीग सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळवले जाणारे सामने लोकल टायमिंगनुसार सकाळी साडेनऊ वाजता होतील. भारतीय वेळेनुसार या तीन सामन्यांची सुरूवात रात्री ८ वाजल्यापासून सुरू होतील.तर फ्लोरिडामध्ये खेळवल्या जाणाऱ्या टीम इंडियाच्या शेवटच्या लीगमधील लोकल टायमिंगनुसार सकाळी साडेदहा वाजता आहे. दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!