उद्रेक न्युज वृत्त :- विश्वचषकातील १७ वा सामना बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाचा रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने दिलेले २५७ धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा विजय मिळवला.
बांगलादेश प्रथम फलंदाजी करत भारताला २५७ धावांचे आव्हान दिले होते.बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा,शुबमन गिल,विराट कोहलीने दमदार खेळी खेळली. बांगलादेशने दिलेले आव्हान भारताने ४१.३ षटकात तीन गडी गमावून पूर्ण केले.या डावात विराट कोहलीने शानदार शतक ठोकले.
विराट कोहलीने ९७ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या.या शतकात ६ चौकार आणि ४ षटकारांचा सामावेश आहे.तर केएल राहुलने ३४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार ठोकून ३४ धावा कुटल्या.कोहली आणि राहुलने चौथ्या गडीसाठी ८३ धावांची नाबाद भागीदारी रचली.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकात ८ गडी गमावून २५६ धावा चोपल्या.बांगलादेशच्या तंजीद हसन आणि लिटन दासने पहिल्या विकेटसाठी ९३ धावा कुटल्या.तंजीद खान ५१ धावांवर पायचीत झाला.तर लिटने ८२ चेंडूत ६६ धावा कुटल्या.महमूदुल्लाहने ४६ धावांचे योगदान दिले.बांगलादेशच्या लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा कुटल्या.तर भारतासाठी मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.या विजयामुळे टीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला आहे.