Tuesday, March 25, 2025
Homeमुंबईटायर फुटणे हे देवाचे कृत्य नाही...!- विमा कंपनीला न्यायालयाने फटकारले; नुकसानभरपाई देण्याचे...
spot_img

टायर फुटणे हे देवाचे कृत्य नाही…!- विमा कंपनीला न्यायालयाने फटकारले; नुकसानभरपाई देण्याचे दिले निर्देश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- मुंबईतील रस्ते अपघाताच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई न्यायालयाने टायर फुटणे हे देवाचे कृत्य नसून मानवी निष्काळजीपणा आहे; अशी टिप्पणी केली.एका विमा कंपनीने रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याविरोधात याचिका दाखल केली होती.हीच याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आली आहे.न्यायमूर्ती एस.जी. डिगे यांच्या एकल खंडपीठाने १७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात,न्यू इंडिया ईनश्युरन्स कंपनी लिमिटेडने मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाच्या २०१६ च्या निवाड्याविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळून लावले.यामध्ये पीडित मकरंद पटवर्धनच्या कुटुंबाला १.२५ कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते.२५ ऑक्टोबर २०१० रोजी पटवर्धन हे त्यांच्या दोन साथीदारांसह कारमधून पुण्याहून मुंबईकडे येत होते.दरम्यान कारच्या मागील चाकाचा टायर फुटून कार खड्ड्यात पडली.या अपघातात पटवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला.न्यायाधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले होते की,पीडित हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहे.त्याच वेळी,विमा कंपनीने आपल्या अपीलात म्हटले होते की नुकसान भरपाईची रक्कम जास्त आहे आणि टायर फुटणे हे ईश्वराचे कृत्य आहे. चालकाच्या निष्काळजीपणाचे परिणाम नाही.त्याच वेळी,उच्च न्यायालयाने हे अपील स्वीकारण्यास नकार दिला आणि सांगितले की,डिक्शनरीमध्ये ऍक्ट ऑफ गॉडचा अर्थ ऑपरेशनमध्ये अनियंत्रित नैसर्गिक शक्तींचे उदाहरण आहे.या घटनेतील टायर फुटणे ही देवाची कृती म्हणता येणार नाही.हा मानवी निष्काळजीपणा आहे.कोर्ट पुढे म्हणाले,’टायर फुटण्याची अनेक कारणे आहेत,जसे की जास्त वेग,कमी वारा,जास्त हवा किंवा सेकंड हँड टायर आणि तापमान.’आदेशात म्हटले आहे की, ‘प्रवास करण्यापूर्वी गाडीच्या चालकाने टायर्सची स्थिती तपासली पाहिजे.टायर फुटणे ही नैसर्गिक क्रिया म्हणता येणार नाही.हा मानवी निष्काळजीपणा आहे.’ उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की,केवळ अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हणणे म्हणणे हा विमा कंपनीला नुकसानभरपाई देण्यापासून मुक्त करण्याचा आधार असू शकत नाही.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!