Thursday, October 15, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील महिलांनी उपविभागीय कार्यालयास दिली धडक - दारूविक्री बंदी सोबतच विविध...

देसाईगंज तालुक्यातील महिलांनी उपविभागीय कार्यालयास दिली धडक – दारूविक्री बंदी सोबतच विविध मागण्यांचे निवेदन केले सादर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर उत आले असून यावर निर्बंध घालण्यात यावा त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी देसाईगंज  मुक्तिपथ तालुका संघटनेच्या महिला तसेच गावांतील महिला वर्ग एकवटून देसाईगंज शहरातील हुतात्मा स्मारक ते पोलिस स्टेशन,तहसील कार्यालय आणि उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत रॅली काढून सोबतच विविध मागण्यांचे निवेदन शासन दरबारी सादर करून घोषणा दिल्या.

निवेदनामध्ये तालुक्यातील अवैध व्यवसाय,अवैध दारूविक्री बंद करावी,गरीब लोकांसाठी घरकूल उपलब्ध करून रेती उपलब्ध करून द्यावी,सिलिंडरचे भाव कमी करावे,अपंग दारू विक्रेत्यांच्या योजना रद्द कराव्यात,तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील किराणा,पानठेल्यावर कायद्याने बंदी असतानाही सुगंधित तंबाखू विक्री होते.ती बंद करण्याकरिता कायद्या अंतर्गत नोंदणी करावी,आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी शहरासह तालुक्यातील विविध गावातील दारू विक्रेत्यांची यादी पोलिस विभागाला सादर करण्यात आली.

निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज मुक्तिपथ तालुका संघटनेच्या महिला तसेच तालुक्यातील गावांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!