Saturday, October 3, 2026
Homeगडचिरोलीझाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. -...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व दादा पाटील महाविद्यालय कर्जत,जि.अहिल्यानगर यांचे वतीने दरवर्षी साहित्यिकांकरीता राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी १६३ साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात १६ साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून मराठी नाट्यवाड्.मय प्रकारात प्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित धरती आबा : क्रांतीसूर्य‌‌‌ बिरसा मुंडा’ या महानाट्यास यंदाचा नाट्यलेखनाचा सत्यशोधक अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ प्रदान करण्यात आला.
‘सैराट’ या प्रसिद्ध चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध साहित्यिक ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे, सौ.शर्मिला गोसावी,सत्यवान मंडलिक,प्रा.नवनाथ केंदळे,प्रा.तानाजी डाडळ, देविदास राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चुडाराम बल्हारपुरे यांना या वर्षी मराठवाड्यात मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे,तर राज्यस्तरावर मिळालेला हा आठवा पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल झाडीपट्टीत सर्वत्र कौतुक होत असून प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे, रमेश निखारे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू-मेश्राम, नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर, डॉ.दिपक चौधरी,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर(प्रकाशक)इतर साहित्यिक तथा कलावंतांनी शुभेच्छांचा वर्षाव करत अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!