Wednesday, June 24, 2026
Homeकुरखेडाझाडाच्या वेलीने गळफास लावून आत्महत्या; कुरखेडा तालुक्यातील घटना..

झाडाच्या वेलीने गळफास लावून आत्महत्या; कुरखेडा तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-एका ४० वर्षीय इसमाने गावालगत असलेल्या जंगल परिसरात झाडाच्या वेलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.विशेष म्हणजे,ज्या दिवशी घराबाहेर पडला त्या दिवशी कुणालाही वाटले नव्हते की,तो आत्महत्येसारखे एवढे मोठे पाऊल उचलेल.रूपेश नामदेव सहारे वय ४० वर्षे,रा.मौशी(पलगड), ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव असून मृतक रूपेश हा सोमवारच्या सायंकाळी कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेला होता.रात्र होऊनही तो घरी परतला नव्हता. गावाशेजारील मोहगांव येथे सांस्कृतिक नाट्य कार्यक्रम असल्याने तो तिथे गेला असावा,असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त करून त्याचा शोध घेतला नाही.दरम्यान,रूपेश हा
मंगळवारी जगंलात गुरे चराईला गेलेल्या गुराख्याला एका झाडाच्या फांदीला वेलीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.त्याने लगेच गावकरी व त्याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कुरखेडा पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला.काल बुधवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.प्रकरणाचा अधिक तपास कुरखेडा पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!