Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरसोने-चांदीच्या दरात ऐतिहासिक उसळी; सर्वसामान्यांसाठी मोठा झटका..

सोने-चांदीच्या दरात ऐतिहासिक उसळी; सर्वसामान्यांसाठी मोठा झटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मागील महिन्याचे सोने-चांदीचे दर आणि आत्ताचे दर बघितले तर सोने आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल ७ हजार ८०० ची,तर चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे ३० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे.मागील महिन्याच्या ३ नोव्हेंबरला ३ टक्के जीएसटी विना १ लाख २१ हजार १०० रुपये सोने तर चांदीचे दर १ लाख ५१ हजार रुपये होते.आता काल,बुधवारी ३ डिसेंबरला सोन्याचे दर १ लाख २८ हजार ९०० रुपये,तर चांदी १ लाख ८१ हजार ८०० रुपयांवर पोहचली.विशेष म्हणजे,या तेजीमुळे मंगळवारच्या तुलनेत बुधवारी एकाच दिवसात सोने ९०० रुपयांनी तर चांदीचे दर ५ हजार ५०० रुपयांनी वाढले.या विक्रमी भाववाढीचा कल पाहून सराफा तसेच गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांसाठी सोने-चांदी पुन्हा एकदा सर्वाधिक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक म्हणून सिद्ध होत आहे.मात्र,सर्वसामान्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.सोन्या-चांदीच्या दरातील ही मोठी वाढ प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी,आर्थिक अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांचा थेट परिणाम आहे.जागतिक स्तरावर विविध ठिकाणी भौगोलिक आणि राजकीय तणाव वाढला आहे.अशा अनिश्चित परिस्थितीत, गुंतवणूकदार जोखीम कमी करण्यासाठी इक्विटी किंवा इतर अस्थिर मालमत्तांमधून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेत गुंतवित आहेत.जगभरात महागाईचा दर अजूनही उच्च असल्याने, गुंतवणूकदार महागाईच्या नुकसानीपासून बचावासाठी सोने आणि चांदीकडे वळत आहेत.तज्ज्ञांच्या मते,सध्याची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!