Monday, August 24, 2026
Homeभंडाराजोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. - वैनगंगा...

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.शेतांमध्ये ओलावा वाढल्याने धान पिकाच्या वाढीस त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.सध्या खरीप पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पावसाची आवश्यकता आहे.त्यामुळे ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आगामी काळातही पावसाची हजेरी राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.अश्यातच गोंदिया जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने भंडारा जिल्ह्यातील नदीच्या पाणीपातळीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात कालीसरार व पुजारीटोला या दोन्ही धरणांतून सोडण्यात आलेले पाणी वैनगंगा नदीच्या प्रवाहातून पुढे भंडारा जिल्ह्याच्या दिशेने येत आहे. त्यामुळे आगामी काळात वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे चारही दरवाजेही उघडण्यात आले असून त्यातून ३ हजार ४९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तर वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे वैनगंगा नदीवरील धापेवाडा धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले.सध्या त्यातून ९७ हजार ३१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह मध्य प्रदेशातील लगतच्या भागांतही जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे.परिणामी,वैनगंगा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असून,धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्या गावांतील रहिवाशांना सतर्क राहण्याचा  सल्ला देण्यात आला असून नागरिकांना नदीपात्रात किंवा नदीकिनारी असलेल्या धोकादायक भागांजवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!