Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजजुनी वडसा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमीत्य महिला बचत गटांना मार्गदर्शन..

जुनी वडसा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमीत्य महिला बचत गटांना मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या  दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्थापन वसुंधरा वस्ती स्तर संस्था चव्हाण वार्ड व उडाण वस्ती स्तर संघ जुनी वडसाच्या संयुक्तविद्यमाने जुनी वडसा येथील समाज भवनात आज,शनिवार ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित करुन महिला बचत गटांतील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जीजाऊ यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन व प्रतिमेला माल्यार्पन करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.यावेळी वस्ती स्तर संघाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या तिरंगा थाली स्पर्धा,कबड्डी स्पर्धा,धावणे स्पर्धा व ईतर विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेच्या अध्यक्षा लता सुंदरकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सचिन खरकाटे,लेखापाल अविनाश राठोड, नगरसेविका ज्योत्सना लूटे,लता मुळे,माजी नगरसेविका अश्वीनी कांबळे,शोभा पत्रे,तर मार्गदर्शक म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे, सहाय्यक कृषी अधिकारी कल्पना ठाकरे, मुख्याध्यापक किशोर चव्हाण,प्रतिक्षा देशपांडे,सोनी खरकाटे,वसुंधरा वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा भारती कांबळे,उडाण वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा सरीता ढोरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.सदर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता मुळे यांनी केले,तर कार्यक्रमाचे संचालन रंजु सहारे,आभार प्रदर्शन राजश्री बेदरे यांनी केले.या कार्यक्रमास समुह संसाधन व्यक्ती दिपाली कुथे व जुनी वडसा येथील महिला बचत गटाच्या सर्व पदाधिकारी तथा सदस्यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!