Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीआता दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित सर्व कायदेशीर कागदपत्रांवरील...

आता दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित सर्व कायदेशीर कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे.महसूल व वन विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रातील आदेशानुसार,शेतकऱ्यांनी घेतलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित सर्व कायदेशीर कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क आता पूर्णतः माफ करण्यात आले आहे.हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासूनच लागू झाला आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणारे विविध करारनामे, हक्कविलेख निक्षेप,तारण गहाणखत,हमी पत्र,गहाणाचे सूचनापत्र किंवा घोषणापत्र यांसारख्या कोणत्याही संलेखावर आता मुद्रांक शुल्क भरावा लागणार नाही.या सवलतीचा लाभ प्रामुख्याने पीक कर्ज घेणाऱ्या अल्पभूधारक व गरजू शेतकऱ्यांना होणार असून,कर्ज प्रक्रियेत येणारा अतिरिक्त आर्थिक खर्च यामुळे वाचणार आहे.
गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनाचा हा निर्णय कृषी क्षेत्राला बळकटी देणारा असून शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्ज प्रकरणांसाठी या योजनेचा फायदा घ्यावा,असेही त्यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!