उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेला थंडीचा कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु उत्तरेतून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील काही भागात अद्यापही थंडी कमी झालेली नाही. नाशिक, जळगाव, विदर्भातील काही जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडी राहण्याची शक्यता आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा,विदर्भ व परीसरात हलका -मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच २५ तारखेपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
अशीच परिस्थिती देशातील काही भागात राहण्याची शक्यता आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ जानेवारीपासून पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा कहर होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर २३ जानेवारीपासून उत्तर भारतात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.