- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गरजूंना हक्काचे घर मिळावे; यासाठी शासनाकडून पीएम आवास योजना,शबरी आवास, रमाई आवास योजना व इतर आवास योजना राबविल्या जातात.मात्र,घरकुल लाभार्थ्यांना वेळोवेळी हप्ते मिळत नसल्याने घरकुलाचे काम करणे कठीण झाले आहे.घरकुल बांधकामासाठी ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या १ लाख २० हजार रुपयांत घरकुल बांधकाम सुरू केले.मात्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात दिलेल्या आर्थिक सहाय्यानंतर पुढील रक्कम दिली नसल्याने घरकुल लाभार्थ्यांचे काम अर्धवट आहे.अशातच हल्ली बऱ्याच योजनांपैकी अनेकांचे अनुदान वा अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहेत.मात्र,घरकुल लाभार्थ्यांनाच रक्कम मिळेनाशी झाल्याने घर बांधावे कसे? असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे.
महागाई काळात तुटपुंज्या रकमेत घरांचे बांधकाम होत नसतानादेखील शासनाच्या मदतीने १.२० लाखांचा निधी देण्यात येतो.पहिला हप्ता मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे; मात्र शासनाने दुसऱ्या हप्त्यासह हप्ता तिसरा व चौथाही हप्ता दिला नाही.त्यातच घरकुल बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने लाभार्थी दुसऱ्यांकडून उसनवारी रक्कम गोळा करून बांधकाम करतांना दिसत आहेत. त्यातच सन २०२२-२३ या वर्षात देसाईगंजसह अनेक तालुक्यातील कोणत्याही रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने अवैद्य रेती तस्करी करणाऱ्यांकडून एक हजार रुपयांत मिळणारी रेती चार ते पाच हजार रुपये देऊन घर बांधकामासाठी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे घराचे संपूर्ण बजेटच कोलमडले आहे.त्यामुळे पीएम आवास,शबरी आवास व रमाई आवास योजनेतील घरकुलाचा थकीत निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा; अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
- Advertisement -

