Tuesday, September 22, 2026
Homeदेसाईगंजजन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या शिबिरात तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली व चश्मे वाटप करत आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना माजी नगराध्य किसन नागदेवे म्हणाले की,गणेशोत्सव साजरा करतांना साईमंदीर समितीच्या सदस्यांनी ‘जन सेवा हिच इश्वर सेवा’ ह्या उद्घोषाची प्रचिती करुन दिली.या गणेशोत्सवात समितीच्या सदस्यांनी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले.या उपक्रमात जवळपास २ हजार ५०० रुग्ण आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेत आहेत,ही अतिशय गौरवाची बाब आहे.या शिबिरात कॅन्सर रुग्ण तपासणी,नेत्र रोग तपासणी, हृदय रोग,ब्लड प्रेशर,मधुमेह तपासणीसह दंत तपासणी करून विदर्भातिल प्रसिद्ध डॉक्टकांच्या चमुकडुन इतर उपचार करण्यात आले. पैस्याची इतरत्र उधळण न करता आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरातुन साईमंदीर समितीने मानवतेचे दर्शन घडविले.ही खरी इश्वर सेवा व मानवतेचे दर्शन घडविणारी बाब असल्याचे किशन नागदेवे यांनी म्हटले.
या प्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, नगराध्यक्षा लता सुंदरकर,देसाईगंज तहसिलदार प्रिती डुडुलकर,नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी,उपनगराध्यक्ष नरेश विठ्ठलानी,सभापती  माडुलवार,सभापती सचिन खरकाटे,नगरसेवक विलास लोखंडे,विकास प्रधान राजु जेठानी, नगरसेविका पल्लवी मेंढे,मंदा समर्थ,पार्वता बेदरे, आशा दहिवले,राधिका पत्रे,गुरुमितप्रित कौर चावला यांचेसह पत्रकार प्रा.दयाराम फटिंग.प्रा.दिलिप कहुरके,आनंदसिंग चावला,राजु आकरे,भोला पटेल, चन्द्रकुमार दुबे,शालु दंडवते यांचेसह संजय साळवे यांनी उपस्थिती दर्शविली.या आरोग्य तपासणी शिबीरात शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपुरच्या तज्ञ चमूने १६७ रुग्णांची ह्रदयरोग तपासणी करुन औषधोपचार केले.डॉ.प्रणय कोडाप.डॉ.उमाका राऊत यांनी ब्लड शुगर तपासणी करुन औषधोपचार केले.यासह डॉ.अश्विन ढोले व डॉ.मेघा ढोले या दाम्पत्याने रुग्णांची दंत तपासणी करुन औषधोपचार केले.कॅनक्य्अर हॉस्पिटल नागपुरचे विद्यमाने कॅन्सर रोग तज्ञ डॉ.अविनाश भोयर व डॉ.रुता भोयर यांनी संभाव्य रुग्णांची तपासणी केली.नेत्ररोग तज्ञ डॉ. सुनिल फुंडके,डॉ.बि.पी.घोरपडे या चमुने तब्बल ६२३ रुग्ण तपासणी करुन ५२८ रुग्णांना मोफत चश्मे वाटप केले.या सेवाभावी उपक्रमामुळे साईमंदिर देवस्थान समिती राजेंद्र वार्डच्या सदस्यांवर सर्वत्र अभीनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!