Friday, October 2, 2026
Homeदेसाईगंजजनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम लागू करा; अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन व जनगणनेवर...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम लागू करा; अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन व जनगणनेवर बहिष्कार.. -सकल ओबीसी संघटनेचा इशारा; आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सादर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आगामी होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत ओबीसी समाज सहभाग नोंदवणार नाही. ड्रॉप-डाऊन मेन्यु व स्वतंत्र काॅलम लागु करण्यात यावा; अन्यथा येत्या,२५ ऑक्टोंबर २०२६ पासुन देशव्यापी तीव्र आंदोलन व जनगणनेवर बहिष्कार घालण्याचा इशारा सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज,शुक्रवार २ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की,सकल ओबीसी महामोर्चा’च्या वतीने देशातील ५० टक्क्यांहून अधिक असलेल्या इतर मागासवर्गीय(OBC)बांधवांच्या अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नाकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.भारतात सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या धोरणांची आखणी करण्यासाठी जातनिहाय जनगणनेची अचूक आकडेवारी असणे अत्यंत आवश्यक आहे.परंतु,केंद्र सरकारकडून जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवता ओपन-एंडेड(Open-ended) स्वरूपात जात विचारण्याची पद्धत अवलंबली जात आहे,ज्यावर सकल ओबीसी समाजाचा तीव्र आक्षेप आहे.
  • सकल ओबीसी समाजाची प्रमुख भूमिका,निरीक्षणे व आक्षेप👇
 सन २०११ मधील सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जनगणनेत(SECC)ओपन-एंडेड प्रश्न विचारल्यामुळे देशभरातून तब्बल ४६ लाख ७० हजारांहून अधिक जाती-पोटजातींची नोंद झाली.उच्चार,स्पेलिंग आणि स्थानिक नावांच्या फरकामुळे मिळालेला संपूर्ण डेटा सदोष ठरला आणि त्याचा मागासवर्गीयांच्या विकासासाठी कोणताही उपयोग झाला नाही.स्वतंत्र कॉलम आणि ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ची आवश्यकता:
अनुसूचित जाती(SC)आणि अनुसूचित जमाती(ST) यांच्याप्रमाणेच ओबीसी प्रवर्गासाठीही जनगणनेत स्वतंत्र कॉलम देण्यात यावा.तसेच उपलब्ध केंद्रीय व राज्यस्तरीय मागासवर्ग याद्यांच्या(SEBC Lists) आधारे संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ तयार करूनच नोंदणी करण्यात यावी,जेणेकरून अचूक आकडेवारी समोर येईल.
१९३१ च्या जातनिहाय जनगणनेनंतर मोठ्या प्रमाणावर ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश करण्यात आला असून त्यांची निश्चित टक्केवारी सांगणे कठीण आहे.त्यामुळे स्वतंत्र कॉलम नसल्यास ओबीसींचा सहभाग नाही.ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यास देशातील ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या व सामाजिक-आर्थिक वास्तव कधीच समोर येणार नाही.याचा थेट परिणाम शिक्षण, रोजगार,बजेट वाटप आणि आरक्षणाच्या धोरणांवर होणार असून हा ओबीसी घटकावर मोठा अन्याय ठरेल.त्यामुळे “जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल,तर ओबीसींचा सहभाग नसेल समाजाची स्पष्ट व ठाम भूमिका आहे.
  • देशव्यापी आंदोलन व बहिष्काराचा इशारा👇
मागासवर्गीयांच्या या न्याय्य हक्कांसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये असंतोष खदखदत असून आंदोलने सुरू झालेली आहेत.केंद्र सरकारने तात्काळ जनगणनेच्या सध्याच्या सदोष प्रश्नावली व पद्धतीमध्ये सुधारणा करून ओबीसींसाठी ‘स्वतंत्र कॉलम’ आणि ‘ड्रॉप-डाऊन यादी’ जाहीर करावी.या मागणीचा तातडीने सकारात्मक विचार न झाल्यास,येत्या २५ ऑक्टोंबर २०२६ पासून संपूर्ण देशातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल,तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि आगामी जनगणनेवर पूर्णपणे बहिष्कार टाकला जाईल.या आंदोलनामुळे व बहिष्काराच्या पवित्र्यामुळे देशात निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची असेल,असा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देतांना सकल ओबीसी समाजाचे लोकमान्य बरडे,धनपाल मिसार,प्रा.दामोदर शिंगाडे,अनिल कोठारे,राहुल भांडेकर,लीलाधर भरडकर,भावेश मुंगणकर,मिलिंद खोब्रागडे,सुरेश भांडेकर,संतोषी सूत्रपवार,सागर वाढई,अरुण कुंभलवार, चंद्रकांत शिवणकर,दादाजी चौधरी,कमलेश बारस्कर, भास्कर पिपरे,महेंद्र ठवरे,प्रांजल धाबेकर,गौरी मंगर, तुलाराम नैताम, मेघराज बुराडे,जीवन शिवणकर,दादाजी खरकाटे,पुंडलिक देशमुख,सूर्यभान सेलोटे,एकनाथ पिलारे, महेंद्र लटारे,गौरव येणपरेड्डीवर,पंकज धोटे, गजानन सेलोटे,ज्ञानदेव पिलारे,राजेंद्र बुल्ले,हरिभाऊ पत्रे, सदाराम ठाकरे,रामजी धोटे,चक्रधर पारधी,परासराम ठाकरे,नितीन राऊत,योगेश ढोरे,विलास ठाकरे, ज्ञानेश्वर कवासे,नितेश अवसरे,संदीप वाघाडे,शैलेंद्र वाघमारे,विष्णू दुणेदार,महेश पिलारे,नरेश चौधरी आदी पदाधिकारी व जिल्ह्यातील बहुसंख्य ओबीसी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी ४३ वर्षीय शिक्षक...

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!