Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजजनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविले आहे.
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.२०११ च्या सामाजिक,आर्थिक व जातीय जनगणनेमध्ये(SECC) ओबीसी समाजाची नोंद करण्यात आली होती.मात्र,या आकडेवारीचा ओबीसी समाजाच्या विकासासाठी अपेक्षित उपयोग झालेला नाही,असा आरोप संघटनेने निवेदनातून केला आहे.
आगामी जनगणनेत अनुसूचित जाती(SC)व अनुसूचित जमाती(ST)यांच्याप्रमाणे ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावा.तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होण्यासाठी जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
“ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्यास ओबीसींचा जनगणनेतील सहभाग नसेल,” अशी स्पष्ट भूमिका संघटनेने घेतली आहे.स्वतंत्र कॉलम न दिल्यास ओबीसी समाजाच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व रोजगारविषयक परिस्थितीचे वास्तव चित्र समोर येणार नाही.त्यामुळे आगामी काळात ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या मागणीसाठी केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून आगामी जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. अन्यथा निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची राहील,असा इशारा देण्यात आला आहे.
सदरचे निवेदन देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आले असून निवेदन सादर करतेवेळी ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष लोकमान्य बरडे,धनपाल मिसार,दामोधर शिंगाडे,सादराम ठाकरे, प्रशांत देवतळे,अरुण राऊत,महेश पिलारे,प्रदिप तुपट, प्रदिप कुथे,उमेश राऊत,अरुण कुंभलवार,विकास प्रधान नगरसेवक,ज्ञानेश्वर पिलारे, पंकज धोटे,सुनील पारधी, प्रमोद झिलपे,सागर वाढई, दिनेश बेदरे,आशिष भेंडारे, कैलास बगमारे,चक्रधर नाकाडे,मातेरे शिक्षक,पुरषोत्तम उरकुडे,पुसतोडे, पिलारे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.विशेष म्हणजे,निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोग(NCBC)यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!