Sunday, May 3, 2026
Homeकुरखेडाजखमी युवकाचा तीन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू.. - देसाईगंजहून कुरखेडा जात असतांना...

जखमी युवकाचा तीन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू.. – देसाईगंजहून कुरखेडा जात असतांना घडला होता अपघात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली) :-कुरखेडा तालुक्याच्या गोठणगाव येथील २१ वर्षीय युवकाचा देसाईगंजहून दुचाकीवरून कुरखेडाकडे जात असतांना वाटेत नान्ही फाट्या नजिक बुधवारी १२ फेब्रुवारीला शेतातून चिखलणी करून परतणाऱ्या ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला धडक दिली होती.यात मयूर देवराव घुगुसकर वय २१ वर्षे,रा.गोठणगाव,ता.कुरखेडा नामक युवक गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्याला मार लागला होता.त्यानुसार त्याला तातडीने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारानंतर त्यास नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असतांना काल शनिवार १५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता त्याची प्राणज्योत मावळली.मयूरच्या दोन बहिणी,आई-वडील असा आप्तपरिवार आहे.मयूरच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!