Wednesday, August 5, 2026
Homeगोंदियाचेक बाऊन्स कराल तर जेलची हवा खाणार; चेक बाऊन्स केल्याने एकास सहा...

चेक बाऊन्स कराल तर जेलची हवा खाणार; चेक बाऊन्स केल्याने एकास सहा महिन्यांचा कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-चेक बाऊन्सप्रकरणी देवरी येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीला सहा महिन्यांचा कारावास व १ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.राजकुमार मेश्राम असे न्यायालयाने शिक्षा व दंड ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
देवरी येथील व्यापारी विनोदकुमार अग्रवाल यांचे घर बांधण्याचा करारनामा कंत्राटदार राजकुमार मेश्राम यांनी केला होता.पण मेश्राम याने करारनाम्यानुसार काम केले नाही.तसेच अग्रवाल यांच्याकडून अधिकचे पैसे घेऊन मध्येच काम सोडून दिले.करारनाम्यानुसार मेश्राम यांनी काम न केल्याने अग्रवाल यांनी राजकुमार मेश्राम यांना पैसे परत मागितले असता मेश्राम याने अग्रवाल यांना चेक दिला.पण तो चेक बँकेत जमा केला असता दिलेला चेक बाऊन्स झाला.याप्रकरणी विनोदकुमार अग्रवाल यांनी देवरी येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणाची सुनावणी करतांना सर्व पुराव्यांची पडताळणी करून देवरी येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी राजकुमार मेश्राम याला सहा महिन्यांचा कारावास व १ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात फिर्यादी विनोदकुमार अग्रवाल यांच्याकडून ॲड. भूषणकुमार मस्करे,ॲड.प्रीती मस्करे,ॲड.सयोग बन्सोड,ॲड.रेश्मा माहुलकर यांनी बाजू मांडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!