Monday, August 17, 2026
Homeनवी दिल्लीचींधीचोरी...! कार ४० लाखाची अन् चोरी रस्त्यावरील ठेवलेल्या कुंड्यांची 

चींधीचोरी…! कार ४० लाखाची अन् चोरी रस्त्यावरील ठेवलेल्या कुंड्यांची 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :-दिल्लीमध्ये G-20 सम्मेलन होणार असल्याने सर्वत्र सुशोभीकरणाचे काम सुरु असून रस्त्यांच्या दुतर्फा फुलांच्या कुंड्या ठेवल्या जात आहेत.सदर रस्त्यांच्या दुतर्फा फुलांच्या कुंड्या चोरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.विशेष म्हणजे चोरटे श्रीमंत घरातले असून चाळीस लाखांच्या कारमधून त्यांनी ही चोरी केली.याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मनमोहन असे आहे.मनमोहनचा साथीदार नवाब सिंह हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मनमोहन हा गुरुग्राममधल्या गांधी नगर परिसरात राहाणारा असून व्यवसायाने तो प्रॉपर्टी डिलर आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील कारच्या नंबर प्लेटमुळे पोलिसांनी आरोपी मनमोहनला अटक केली. ज्या अलिशान कारमधून कुंड्या चोरण्यात आल्या होत्या; ती कार मनमोहनच्या पत्नीच्या नावावर आहे. या प्रकरणातील दुसरा फरार आरोपी नवाब सिंह गुरुग्रामधल्या ॲथॉरिटी GMD पदावर कार्यरत आहे. 

मनमोहन आणि नवाब सिंह हे आपल्या KIA CARNIVAL या कारमधून दिल्लीहून गुरुग्राममध्ये येत होते.कारची किंमत जवळपास ४० लाख रुपये इतकी आहे.कार गुरुग्राममध्ये आली असता त्यांना रस्त्याच्या एका बाजूला सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या दिसल्या.या कुंड्या चोरण्याचा मोह त्यांना झाला.त्यांनी रस्त्याच्या कडेला कार थांबवली आणि काही कुंड्या कारमध्ये टाकल्य आणि तिथून फरार झाले.पण त्यांची हे कारमाने एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.याची कल्पना त्यांना मुळीच नव्हती.सदर प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि बघता बघता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!