Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा आपत्ती व्यवस्थापन गडचिरोलीतर्फे १२ यात्रांचे नियोजन यशस्वी 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन गडचिरोलीतर्फे १२ यात्रांचे नियोजन यशस्वी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली द्वारे यावर्षी प्रथमच जिल्हयातील सिरोंचा येथील उरूस तसेच विविध तालुक्यातील ११ यात्रा,ज्यामध्ये सोमनुर,गुमलकोंडा,वेकंटापूर,वांगेपल्ली,चपराळा, मार्कंडा,वैराड,देऊळगांव-आवळगाव,पळसगाव,अरततोंडी,डोंगरी या ठिकाणी १८ फेब्रुवारी पासुन महाशिवरात्री निमीत्ताने विविध यात्रांचे आयोजन जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीणा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.सदर यात्रांमध्ये यात्रा आपत्ती व्यवस्थापनाकरीता प्रथमच जिल्हयातील प्रशिक्षीत ३०० आपदा मित्रांचा समावेश करण्यात आला.जिल्हयातील विशेषत: मार्कंडा येथील यात्रेमध्ये नदीपात्रामध्ये कोणतीही अनुचित घटना घडु नये; या करीता एसडीआरएफ नागपूर येथील २६ जवानांचे पथक,पोलीस विभागातील बचाव पथक,बोट व इतर बचाव साहित्यासह तसेच आपदा-मित्र व आपदा-सखी यांचे पथक मार्कंडा येथे यात्रा कालावधीमध्ये तैनात करण्यात आले होते.सदर केलेल्या उपाययोजनामुळे जिल्हयातील सर्व यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यात आलेल्या असून कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.विशेषत: मार्कंडा येथे यात्रेमध्ये प्रंचड गर्दी अनुभवास मिळाली तसेच पळसगाव तालुका आरमोरी येथे २६ फेब्रुवारी रोजी प्रंचड मोठया प्रमाणावर गर्दी आढळून आली.दरवर्षी वांगेपल्ली तालुका अहेरी तसेच देऊळगांव-आवळगाव यात्रेत अनुचित घटना घडायच्या मात्र या वर्षी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.तसेच यावर्षी देऊळगांव-आवळगाव मार्ग बंद करण्यात आलेला होता.आपत्ती व्यवस्थापनाचे दृष्टीने जिल्हयातील सर्व आपदा मित्रांनी महत्वपुर्ण भुमिका पार पाडलेली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!