Wednesday, October 21, 2026
Homeदेसाईगंजचारचाकी वाहनातुन दारु तस्करी; देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई.. -९ लाख रुपयांचा मुद्देमाल...

चारचाकी वाहनातुन दारु तस्करी; देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई.. -९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात दारु बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची अवैध दारू पकडली जाते.मात्र,दारूची तस्करी थांबण्याचे नावच घेत नाही.कारण मागणी आणि पुरवठा यांचा तात्काळ ताळमेळ बसत असल्यानेच गोरखधंद्याचा खेळ सुरू झालाय.त्यातच,झटपट श्रीमंतीच्या नादात दारु तस्कर  चक्क महागड्या चारचाकी वाहनांचे वापर करुन दारु तस्करीचा गोरखधंदा करण्याची क्लूप्ती आखु लागलेत. मागील काही दिवसांपुर्वीच देसाईगंज पोलीस प्रशासनाने दारु बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील तब्बल तीन दारुविक्रेत्या महिलांवर हद्दपार करण्याची कार्यवाही केली.पण,इजी मनी कमविण्याच्या नादात दारु विक्रेते महागड्या चारचाकी वाहनांचा वापर करुन दारु तस्करीची क्लूप्ती आखत असले तरी देसाईगंज पोलीसांनी अवैध दारु तस्करीवर अंकुश लावण्यासाठी यशस्वी मोहीम हाती घेत दोन दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबत अधिक माहिती अशी की,देसाईगंज तालुक्यातील कुरुड रोड लगत एक ‘एक्सयूव्ही’ चारचाकी वाहन क्रमांक-एमएच ४६ पी ५४५९ हे भरधाव वेगाने येत असुन या वाहनातुन दारु तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती काल रविवारी देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक स्वप्निल इजप्पवार यांना मिळाली.माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.सदरचे वाहन मार्गावर येताच वाहनास थांबवून तपासणी केली असता त्यात प्रवरा कंपनीच्या २५ पेट्या देशी दारु आढळून आली.सदरचा मुद्देमाल वाहुन नेणारे गुरुविंदर सिंग तेजसिंग डांगी वय २८ वर्षे,रा.जोगापुर, ता.गोंडपिंपरी,जि.चंद्रपूर व हरगोविंदसिंग डांगी रा.डोंगरगांव,ता.आरमोरी, जि.गडचिरोली या दोन दारु तस्करांना ताब्यात घेतले.या कारवाईत पोलिसांनी महागडे ‘एक्सयूव्ही’ चारचाकी  वाहन व २५ पेट्या देशी दारु असा एकुण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदरची कारवाई देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील इजपवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष गोडबोले,फौजदार नितेश कढव,राजू उराडे,शैलेश तोरपकवार,ताटलावार,सचिन शेरेकर,शैलेश कसारे, प्रदिप भसारकर यांनी पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!