Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्राहकांची अपेक्षा फोल; सोने ९० हजारांच्या पार..

ग्राहकांची अपेक्षा फोल; सोने ९० हजारांच्या पार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गतवर्षी केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात लक्षणीय ९ टक्के कपात केल्याने,आयात शुल्क १५ वरून ६ टक्क्यांवर आले होते.त्यामुळे सोने दर घटून ७५ हजारांवरून थेट ७० हजारांपेक्षा कमी प्रतितोळ्यावर आले होते.त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये फारशी वाढ न होता,दर आणखी कमी होतील,अशी  ग्राहकांना अपेक्षा होती.मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या घडामोडींमुळे दर अल्पावधीतच पूर्वस्थितीत आले.पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सोने दरातील तेजीने प्रचंड वेग धरल्याने,अवघ्या दोनच महिन्यांत सोने १० हजारांनी वधारले आहे.
सोने-चांदी हे मौल्यवान धातू स्वस्त होतील,ही ग्राहकांची अपेक्षा आता फोल ठरतांना दिसून येत आहे.सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोने प्रतितोळा ९० हजारांच्या पार गेले आहे.अवघ्या दोनच महिन्यांत सोने तब्बल १० हजारांनी वधारले असून,दरवाढीची गती बघता दसरा,दिवाळीअगोदरच सोने लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान,चांदी दरातही मोठी तेजी बघावयास मिळत आहे.चांदीने पुन्हा एकदा लाखाचा टप्पा पार केला असून,चांदी आता प्रतिकिलो एक लाख तीन हजार रुपयांवर पोहोचली आहे.गेल्या ५ मार्च रोजी चांदीचा दर ९८ हजार रुपये प्रतिकिलो इतका होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!