उद्रेक न्युज वृत्त
कोरची :- शासकीय,निमशासकीय खुल्या जागेवर व मुख्य रस्त्यांवर ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामीण भागात अतिक्रमण वाढतच चालले आहे.अतिक्रमण धारकांमुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील खुल्या जागेवर,मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना वारंवार सूचना व नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपुढे अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोठे आव्हान उभे राहिले आहे.ग्रामीण भागात गावातील नागरिक ये-जा करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर साहित्य ठेवणे,गायी, म्हशी,गुरे-ढोरे बांधणे व लाकूड फाटा ठेवत असल्याने नागरिकांना आवागमन करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.काही दुकान चालक रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने वाहनधारकांना वाहने चालवीतांना मनस्ताप होत आहे.मुख्य रस्ता कमी तर अतिक्रमण जास्त अशी अवस्था झाली आहे.
गावातील काही बलाढ्य पैसेधारक पैस्याच्या जोरावर चक्क शासकीय जागेवरच अतिक्रमण करून बसले आहेत.खुली जागा दिसली की त्यावर सहजरित्या ताबा मिळवून आपली जागा असल्याचा पावित्रा घेतला जात आहे.ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नोंद नसतांनाही जागेवर अवैधरित्या बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना न जुमानता ग्रामीण भागात आपल्याच मनाचा कारभार सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी,सचिव यांनी वरिष्ठ स्तरावरुन अतिक्रमण धारकांविरोधात धडक मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे जनसमान्यांतुन बोलल्या जात आहे.