- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):- तालुक्यातील खरकाडा (पिंपळगाव) येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान कमिटी,तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून एका प्रेमी जोडप्यांचा विवाह रविवारी महादेव मंदिर सभागृहात पार पडला. सुरत भरत मेंढारे वय २५ वर्षे,रा.डोरली चिचगाव असे वर मुलाचे नाव असून वैशाली विठोबा गुरुनुले वय १८ वर्षे रा.चिखलगाव ता.ब्रम्हपुरी असे तरुणीचे नाव आहे.
प्रेमी जोडप्याचे एकमेकांवर प्रेम होते.मात्र, घरच्यांकडून विरोध होत असल्यामुळे त्यांनी खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान कमिटीकडे लग्न लावून देण्यासाठी आग्रह धरला होता.दोघांच्याही कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून त्यांचे लग्न ६ ऑक्टोंबरला सायंकाळी बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थानात लावून देण्यात आले.यावेळी मंदिराचे अध्यक्ष रवींद्र ढोरे,उपाध्यक्ष राजेश्वर पारधी,योगेश ढोरे,उपसरपंच ताराचंद पारधी आदी उपस्थित होते.
- Advertisement -

