उद्रेक न्युज वृत्त
पुणे :- आपल्या छबिने चाहत्यांवर छाप पाडणाऱ्यागौतमी पाटीलला न कळत तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.याच व्हिडीओ प्रकरणी सोशल मीडियावरील वातावरण तापले आहे.अनेकांनी गौतमी पाटीलचा व्हिडीओ शेअर करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी; अशी मागणी केली आहे.याप्रकरणी आता पोलीसही कामाला लागले आहेत.पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात देखील केली आहे.
गौतमी पाटील हिच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमी सोबत ही धक्कादायक घटना घडली होती.आता या सगळ्या प्रकारांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पुणे पोलीस करीत आहेत.