Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीअनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज आमंत्रित

अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज आमंत्रित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही.अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे; अशा विद्यार्थ्यांना भोजन,निवास,निर्वाह भत्ता,व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी  आवश्यक ती  रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने १३ जुन २०१८ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांना ११ वी,१२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मूळ जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या ५ कि.मी.अंतरावर असलेल्या  विविध स्तरातील महाविद्यालयात,शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी,१२वी,पदवी व पदविका परिक्षेमध्ये ५०% गुण असणे अनिवार्य आहे.योजनेमध्ये दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी २१ मार्च  २०२३ पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे.सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे.असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली  यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!