Wednesday, August 19, 2026
Homeभंडारागोसीखुर्द जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ; धरणाचे ३३ दरवाजे खुले..

गोसीखुर्द जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ; धरणाचे ३३ दरवाजे खुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या विविध भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरण जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.पाण्याचा वाढता साठा लक्षात घेता प्रशासनाने धरणातील पाणी पातळी नियंत्रित राहावी यासाठी मोठा निर्णय घेत आज,शनिवार ४ जुलै रोजी सकाळच्या सुमारास गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ३३ दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले.यामुळे वैनगंगा नदीच्या मुख्य प्रवाहात ३,७०६.९८ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.वैनगंगा नदीला येणारा संभाव्य पूर आणि पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता,नदीकिनारी राहणाऱ्या आणि संभाव्य बाधित भागांमधील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षिततेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी २६.३ मिमी पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सक्रिय असला,तरी या कालावधीत जिल्ह्याच्या अड्याळ आणि सिहोरा या दोन प्रमुख विभागांमध्ये सर्वाधिक मुसळधार पाऊस कोसळला आहे.अश्यातच हवामान खात्याकडून पुढील चार दिवस विदर्भात धो- धो पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!