Saturday, May 23, 2026
Homeचंद्रपूरगोवंशाची तस्करी; गुन्हे शाखेची कारवाई.. - दोघे ताब्यात,एकजण फरार..

गोवंशाची तस्करी; गुन्हे शाखेची कारवाई.. – दोघे ताब्यात,एकजण फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवंशाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळून तब्बल ६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करून ८ नग गोवंशाची(बैल)सुटका केली आहे.प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने विजय कुशाल बट्टे वय २७ वर्षे, रा.घडोली, ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर व स्वप्नील प्रल्हाद फुलझेले वय ३२ वर्षे,रा.येरगाव यांना ताब्यात घेत त्यांच्यावर मुल पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक- ६१९/२०२५ नुसार भा.प्रा.क्रू.वा.प्र.अ.१९६०, म.प्रा.सं.अ.१९७६ (सुधारित २०१५)तसेच भारतीय न्याय संहिता २०२४ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणातील मुख्य सूत्रधार फैयाज रा.करीमनगर, जि.तेलंगणा हा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुल पोलीस स्टेशन हद्दीतील नांदगाव येथे रात्रीच्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदी दरम्यान संशयित एमएच ३४ बीझेड ९१५२ क्रमांकाचे पिकअप वाहन थांबवून तपासणी केली असता अत्यंत अमानुष पद्धतीने गोवंशांची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार,अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारे ८ नग गोवंश(बैल)जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेल्या गोवंशांना सुरक्षिततेसाठी प्यार फाउंडेशन,छोटा नागपूर,जि.चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असून ताब्यातील दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना मुल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात मूल उपविभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३...

..यानंतर सापडल्या; तर ‘मकोका’ अन् मालमत्ता जप्तीची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्हा पोलिस प्रशासनाने चंद्रपूर,वरोरा,चिमूर, ब्रम्हपुरी,मूल,राजुरा आणि गडचांदूर या सर्व पोलीस उपविभागांतील सराईत गो-तस्करांची संपूर्ण माहिती संकलित केली असून जिल्ह्यात तब्बल २९३...

पतीवर बिबट्याने झडप घालताच पत्नी गावाच्या दिशेने पळत सुटली; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शुक्रवारचा दिवस हा हिंस्त्र प्राण्यांच्या मानवाच्या शिकारीचा दिवस होता की काय?कारण की, काल शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात...

शाळांच्या सुट्ट्यात वाढ होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात सध्या उष्णतेने कहर केला आहे.राज्यातील अनेक शहरांवर सूर्य आग ओकत असून विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!