Saturday, May 23, 2026
Homeनागपूरनशेखोर तरुणाने किरकोळ वादातून माय-लेकीची केली हत्या..

नशेखोर तरुणाने किरकोळ वादातून माय-लेकीची केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-किरकोळ वादातून दारूच्या आहारी गेलेल्या एका नशेखोर तरुणाने शेजारी राहणाऱ्या माय-लेकीची निघृण हत्या केल्याची चित्त थरारक घटना उमरेड शहरातील गांगापूर कालवा परिसरातील झोपडपट्टीत घडली.काल शनिवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण उमरेड हादरून गेले.नितेश किसन ठाकरे वय ३१ वर्षे,रा.गांगापूर, उमरेड,जि.नागपूर असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे,तर पार्वता शंकर फुकट वय ६५ वर्षे आणि त्यांची मुलगी संगीता वसंता रिठे वय ४० वर्षे,दोघीही रा.गांगापूर,उमरेड अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.
नितेश ठाकरे हा पार्वता फुकट यांच्या घराशेजारी  राहतो.त्याला दारूचे व्यसन असून विनाकारण नशेत नेहमी वाद घालतो.शनिवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास नीतेश आणि पार्वता यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.यावेळी दारूच्या नशेत धुंद असलेल्या नितेशने रागाच्या भरात जवळच असलेला लाकडी दांडा उचलला आणि पार्वता व मुलगी संगीता यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.मृत संगीताच्या पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला होता.संसाराचा आधार तुटल्याने ती आपल्या वृद्ध आई पार्वताबाईकडे गांगापूर कालवा परिसरात राहण्यास आली होती.या माय-लेकी मोलमजुरी करून एकमेकींच्या आधाराने उदरनिर्वाह करत होत्या.मात्र,शेजारच्या नितेशचे व्यसन दोघींसाठी कर्दनकाळ ठरले.पार्वता यांना स्मिता जुमडे नावाची दुसरी मुलगी असून,ती उमरेडमधील मंगळवारी पेठेत राहते.आई आणि बहिणीच्या हत्येचे वृत्त समजताच स्मिताने घटनास्थळी धाव घेतली.रक्ताच्या नात्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून स्मिताला अश्रूचा बांध आवरता आला नाही.घटनेची माहिती मिळताच उमरेडचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीकरिता रवाना केले.निष्पाप माय-लेकीच्या हत्येचा थरार घडवल्यानंतर आरोपी नितेश ठाकरे हा घटनास्थळावरून पळ काढण्याच्या बेतात होता. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून उमरेड पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि निसटण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या.आरोपी नितेशला दारूचे व्यसन जडले आहे.हे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो अधूनमधून मजुरीची कामे करायचा. काही वर्षांपूर्वीच त्याच्या मोठ्या भावाचे निधन झाले असून,सध्या तो आपली आई आणि लहान भाऊ मंगेश यांच्यासोबत गांगापूर कालवा परिसरातील झोपडपट्टीत राहात होता.त्याच्या या व्यसनी प्रवृत्तीचा अंत अखेर दोन निष्पापांच्या बळीने झाला.हत्येप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम१०३(१)अन्वये गुन्हा नोंदवत आरोपी नितेशला अटक केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३...

..यानंतर सापडल्या; तर ‘मकोका’ अन् मालमत्ता जप्तीची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्हा पोलिस प्रशासनाने चंद्रपूर,वरोरा,चिमूर, ब्रम्हपुरी,मूल,राजुरा आणि गडचांदूर या सर्व पोलीस उपविभागांतील सराईत गो-तस्करांची संपूर्ण माहिती संकलित केली असून जिल्ह्यात तब्बल २९३...

पतीवर बिबट्याने झडप घालताच पत्नी गावाच्या दिशेने पळत सुटली; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शुक्रवारचा दिवस हा हिंस्त्र प्राण्यांच्या मानवाच्या शिकारीचा दिवस होता की काय?कारण की, काल शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात...

शाळांच्या सुट्ट्यात वाढ होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात सध्या उष्णतेने कहर केला आहे.राज्यातील अनेक शहरांवर सूर्य आग ओकत असून विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!