Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीगोंडवाना विद्यापीठात रंगणार राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन..

गोंडवाना विद्यापीठात रंगणार राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गोंडवाना विद्यापीठ व विदर्भ साहित्य संघ शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ व ६ मार्च २०२५ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या नव्या सभागृहात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रभरातील युवा साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार असून परिसंवाद,कवीसंमेलन,नाट्यप्रयोग,शायरी,गझल मुशायरा आणि संगीत कार्यक्रमांनी संमेलन रंगणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन आणि ग्रंथदिंडी👇
युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन येत्या ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सभागृहात होणार आहे.यापूर्वी गडचिरोली शहरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध युवा अभिनेते हर्षल पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिकेत प्रकाश आमटे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे,सहस्वागताध्यक्ष प्रशासकीय कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे असतील तर संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रसिद्ध युवा साहित्यिक अक्षय चंदेल सांभाळणार आहेत. उद्घाटनप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते,सरचिटणीस विलास मानेकर आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण उपस्थित असणार आहेत.
परिसंवाद,कवीसंमेलन आणि नाट्यप्रयोग👇
दोन दिवसीय संमेलनात विविध चर्चासत्र,परिसंवाद, कवीसंमेलन,नाट्यप्रयोग,शायरी आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.‘आधुनिक तंत्रज्ञान व मराठी भाषा आणि साहित्य संमेलने’ तसेच ‘वर्तमानाचा वेध’ यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहे. ‘वाचायचे का? काय? कसे?’ या परिसंवादाचे अध्यक्षपद अमृत बंग भूषविणार आहेत.दुपारच्या सुमारास निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून त्याचे अध्यक्षपद मुंबईचे कवी जितेंद्र लाड सांभाळतील.संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्रभर गाजत असलेले जळगाव निर्मित ‘नली’ हे एकल नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
६ मार्चला गझल मुशायरा आणि समारोप सोहळा👇
६ मार्च रोजी विविध परिसंवाद,विद्यार्थ्यांचे कवीसंमेलन आणि गझल मुशायरा पार पडणार आहे. संमेलनाचा समारोप ६ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता होणार असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक देविदास सौदागर हे समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच  सुप्रसिद्ध सरोदवादक विजया कांबळे यांच्या सरोद वादनाने संमेलनाची सांगता होईल.
सदरचे संमेलन गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग,विद्यार्थी विकास विभाग आणि विदर्भ साहित्य संघ शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.सर्व साहित्यप्रेमींनी या संमेलनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!