Saturday, May 2, 2026
Homeभंडारागावठी दारूची कमाल अन् तलाठ्याची धमाल; तलाठी असतो झिंगलेल्या अवस्थेत.. -शेतकरी,शालेय विद्यार्थी...

गावठी दारूची कमाल अन् तलाठ्याची धमाल; तलाठी असतो झिंगलेल्या अवस्थेत.. -शेतकरी,शालेय विद्यार्थी तथा ग्रामस्थ त्रस्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-म्हणतात ना..एकदा अंगात गेली की,अनेकजण स्वतःची ओळख तर विसरतात,त्यातच आपण जनतेचे सेवक आहोत; हेही कर्मचारी विसरत असतात.कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी हा जनतेचा लोकसेवक आहे; तर आमदार,खासदार आणि मंत्री हे जनतेचे लोकप्रतिनिधी असतात.अशातच मी करेन ती पूर्वदिशा अशा आविर्भावात जाणारा मोठी दिघोरी येथील तलाठी रोशन खवास अत्यंत बेजबाबदारपणाचे उदाहरण असून,कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मद्य प्राशन करून येत असल्याने शेतकरी,शालेय विद्यार्थी तथा ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शासनाच्या आदेशानुसार स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. येथील तलाठी कधीच मुख्यालयी राहत नाहीत.त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अनेक प्रकारची कामे येत असतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना धान्य खरेदी केंद्रावर सातबारा व आठ अ ची आवश्यकता भासत असते.कृषी कर्ज अणि विविध शासकीय कामांसाठी तलाठी कार्यालयाकडून अनेक दाखले महत्त्वाचे असतात. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी तलाठी कार्यालयातील दाखल्यांची गरज असते.परंतु येथील तलाठी कधीही कार्यालयीन वेळेवर उपस्थित राहत नाहीत.उपस्थित असलेच तर झिंगलेल्या अवस्थेत असतात.पूरबाधित पंचनामा, धानाची व इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंदाजे करीत असून, बाधित शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहत आहेत.याबाबत शेतकऱ्यांनी काही विचारणा केल्यास कार्यालयात आलेल्या प्रत्येकाशी हुज्जत घालून वेळ मारून नेतात. त्यामुळे शेतकरी असो वा विद्यार्थी सर्वांची कामे रेंगाळलेली आहेत.याबाबत ग्रामस्थांनी तथा लोकप्रतिनिधींनी अनेकदा तहसील कार्यालयात भ्रमणध्वनी तथा अर्ज करुन तक्रार दाखल केली; पण तात्पुरती तंबी देण्यात येते.मात्र, प्रत्यक्षात कोणतीही करवाई केली गेली नाही.तलाठ्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे; अशी मागणी दिघोरी ग्रामस्थांनी केली आहे.
विजय खोब्रागडे,सरपंच, दिघोरी👇
वारंवार संबंधित विभागाला सूचना व तक्रार देऊनही काहीही उपयोग झाला नाही.मागील आठवड्यात तलाठी हे अति मद्य प्राशन करून आल्याची माहिती शेतकऱ्यांनी देताच ग्रामपंचायत कमिटीसह तलाठ्याला तंबी देऊन आलो,तरीसुद्धा नेहमी मद्य प्राशन करूनच कार्यालयात येतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!