- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांचे काल, शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या खेडेगांव येथे प्रथमच आगमन झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे फटाक्यांची आतिशबाजी करीत वाजत-गाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम गावातील मुख्य प्रवेशद्वारावरच आमदार रामदास मसराम यांचे महिला भगीनींकडून औक्षण करीत मिरवणूक काढण्यात आली.प्रसंगी ठिकठिकाणी मिरवणूक दरम्यान महिला वर्गांकडून मसराम व मान्यवरांचे औक्षण करण्यात आले.सदर मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने भगवान बिरसा मुंडा चौकात पोहचत भगवान बिरसा मुंडा व राणी दूर्गावती यांच्या पुतळ्यांची विधीवत पूजन करीत आमदार रामदास मसराम यांचा हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले,कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे,कुरखेडा तालुकाध्यक्ष जिवन पाटील नाट,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी,माजी तंटामुक्त समीती अध्यक्ष तुकाराम डोंगरवार,तंटामुक्त समीती अध्यक्ष विश्वनाथ मेश्राम,वन हक्क समीती अध्यक्ष मधुकर डोंगरवार, उपसरपंच भूमेश्वर सोनवाने,पोलीस पाटील परसराम नाट,टेमनशहा सयाम,दिलीप दर्रो, देविदास बन्सोड,नरेश मडावी,होमराज कवडो,ग्राम सचिव प्रमोद काळे तसेच गावकरी महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.
- Advertisement -